लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात पिकांची राखरांगोळी - हर्षवर्धन पाटील.

harshavardhan patil
harshavardhan patil

वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या कामामुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षाची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असुन शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. लोकप्रतिनिधीने तालुक्याचे वाटोळे केल्याचा गंभीर आरोप माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केला.

निमसाखर (ता.इंदापूर) येथे आयोजित केलेल्या विविध भूमीपूजन व उद्घाटनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत ते होते. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, पंचायत समिती सदस्या सुवर्णा रणवरे, सरपंच अरुणा चव्हाण, उपसरपंच गौरी संजय जाधव, माजी सभापती विलास वाघमोडे, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, ज्ञानदेव बोंद्रे, राजेंद्र गायकवाड, अनिल बोंद्रे, आबासाहेब शिंगाडे, भरत बोराटे हे उपस्थित होते.

खडकवासला धरणातुन इंदापूर तालुक्यासाठी ४० हजार एकरासाठी पाणी येत होते. सणसर कटमधून ही ३.९ टी.एम.सी पाणी मिळत होते. भाटघर धरणाच्या पाण्यावरती इंदापूर तालुक्याचा हक्क आहे. मात्र साडेतीन वर्षामध्ये पाण्याची वाट मोडली आहे. धरणामध्ये पाणी असून ही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. कालव्याचे पाणी कुठे जात आहे ? याचा शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. उन्हाळी हंगामध्ये  ८ हजार २०० एकरावरील पिकांना पाणी मिळण्यास विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाची पिकांची राखरोगंळी झाली आहे. आमचं जळत आहे म्हणून आम्ही पोटतिडकीने बोलत आहोत. मात्र लोकप्रतिनिधी नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मागणी करताना हसत हसत मागणी करुन शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहेत. इंदापूर तालुक्यात शेतीवरती शेतकऱ्यांचे संसार चालत आहेत. अशा प्रवृत्तीला २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ठेचून काढण्याची गरज आहे. साडेतीन वर्षामध्ये लोकप्रतिनिधींनी गावागावात, कुंटूबामध्ये, दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम केले. राज्यामध्ये इंदापूर तालुक्याचे नाव खराब केले असून अधिकाऱ्यांची बोलण्याची भाषा ही असंस्कृत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यावर वचक राहिला नाही, असेही पाटील यावेळी बोलले.

लोणी एमआयडीसीमधील उद्योजकांना सरंक्षण मिळत नाही. त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. साडेतीन वर्षामध्ये नवीन प्रकल्प येण्याचे थांबले असून विस्तारवाढ ही थांबली आहे. पूर्वी एका कंपनीमध्ये आठशे ते हजार मुले काम करीत होती.यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून युवकांची बेरोजगारी वाढली असल्याचा आरोपही1 पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com