मोहोळ : वडाळा येथील कृषीकन्यांचे स्वागत

राजकुमार शहा
गुरुवार, 28 जून 2018

पाटकुल व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती बाबत नवनवीन तंत्रज्ञान विविध पीक पद्धती आदीबाबत या कृषीकन्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना असलेले शेतीज्ञान व शेतकरी प्रत्यक्ष शेतीत घेत असलेले अनुभव यांची देवाण-घेवाण यानिमित्ताने होणार  आहे.

मोहोळ : लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वडाळा येथील कृषीकन्यांचे पाटकुल (ता. मोहोळ) येथे आगमन झाले असुन सरपंच वर्षाताई वसेकर व उपसभापती साधना देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

पाटकुल व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती बाबत नवनवीन तंत्रज्ञान विविध पीक पद्धती आदीबाबत या कृषीकन्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना असलेले शेतीज्ञान व शेतकरी प्रत्यक्ष शेतीत घेत असलेले अनुभव यांची देवाण-घेवाण यानिमित्ताने होणार  आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी जून ते ऑक्‍टोबर या  कालावधीत शेतीतील आधुनिक पद्धती प्रात्यक्षिके शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष अनुभव व चर्चासत्रे आदी कार्यक्रम कृषीकन्या मार्फत राबविले जाणार आहेत. कृषीकन्या म्हणुन रूपाली पाटील, शुभदा पाटील, अनिता हेगडकर, अक्षता पवार, जयश्री वाघमारे, प्रतिभा जाधव या आल्या आहेत. यावेळी ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे, अनिल भोसले, पवन वसेकर आदी उपस्थित होते. 
 
Web Title: agriculture in Mohol