कृषी अधिकारी भोसले निलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

सांगली - जिल्हा परिषदेतील बहुचर्चित चापकटर व कृषी साहित्य खरेदीप्रकरणी कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले यांना अखेर आज निलंबित करण्यात आले. "भोसले वाचले', या गेल्या आठवडाभरातील चर्चांना पूर्णविराम देत त्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत मंत्रालयात सह्या केल्या.

भोसले यांच्यासह खरेदी समितीचे अध्यक्ष, निलंबित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभागाने तशा सूचना ग्रामीण विकास विभागाकडे पाठवल्या असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भोसले यांच्या निलंबनाचे पत्रही सोमवारी जिल्हा परिषदेत धडकणार आहे. याशिवाय, या प्रकरणातील अन्य दोषींच्या विभागीय चौकशीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

दिलीप पाटील यांच्यानंतर रघुनाथ भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करतानाच आता फौजदारी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भोसले हे 31 मे रोजी निवृत्त होत असून, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा काहींचा प्रयत्न होता. आता या खरेदी समितीतील अन्य सदस्य, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील दोन सचिवांची विभागीय चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई अटळ असेल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: agriculture officer bhosale suspend