आगवणे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

आगवणे यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

फलटण (जि.सातारा) : गिरवी ता. फलटण येथील राजकीय नेते व प्रसिद्ध उद्योजक दिगंबर रोहिदास आगवणे यांच्याविरुद्ध पुणे येथील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (ता.7) रोजी एका महिलेने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून आगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आगवणे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला.

दिगंबर रोहिदास आगवणे यांनी याप्रकरणी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन तत्काळ अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर मे जिल्हा सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी (ता. ७/११/२०१८) रोजी दिगंबर आगवणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, अशी माहिती अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आगवणे यांनी एका कंपनीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. सदर गुंतवणुकीचा परतावा मिळावा, यासाठी आगवणे यांनी इतर भागीदार यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी तक्रारदार महिला, कंपनीचे इतर भागीदार व विरोधक या सर्वांनी मिळून कटकारस्थान करून जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने खोटी व बनावट तक्रार करून गुन्हा दाखल केल्याचे आगवणे यांचे वकील अँड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

विशेष बाब म्हणजे तक्रारदार महिलेने ज्या हॉटेलमध्ये गुन्हा घडल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. त्याठिकाणी सदरच्या दिवशी आगवणे उपस्थित नसल्याचे पुरावे अॅड. ठोंबरे यांनी न्यायालयात सादर केले. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आगवणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. अर्जदार आगवणे यांच्या वतीने न्यायालयात अॅड विजयसिंह ठोंबरे व अॅड रूपाली पाटील यांनी काम पाहिले व त्यांस विष्णू होगे व दिग्विजयसिंह ठोंबरे यांनी सहाय्य केले.

माझा न्यायदेवतेवर विश्वास : आगवणे

माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, न्यायदेवता योग्य तो न्याय देईल .सत्य लवकरच समोर येईल. माझ्या बाबतीत असे का घडते मला माहीत नाही. निवडणूक जवळ आली असताना माझी कंपनी जळून माझे 13 ते 14 कोटींचे नुकसान होते व असा खोटा गुन्हा दाखल होतो. यामध्ये काय राजकारण आहे, हे लवकरच समोर येईल. मी निर्दोष आहे. ज्यांनी हे केले आहे. त्यांना कोणी फूस लावून हे कृत्य करायला लावले, त्यांचे सत्य लवकरच जनतेसमोर आणणार आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा. जर मी दोषी आढळलो तर नाना पाटील चौकात फाशी घेईन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com