esakal | तो म्हणाला, चावी भाडेकऱ्याने नेली, कुलूप तोडलं तर निघालं हे घबाड 
sakal

बोलून बातमी शोधा

 In Ahmednagar, 8 tonnes of plastic was recovered from the trader

कुलूप बंद असलेली खोली उघडण्याचा पथकाने लकडा लावला. तो म्हणायचा.. याची चावी भाडेकऱ्याने नेली आहे. ती आल्यावर उघडतो. तास झाला तरी चावी काही येईना, त्यामुळे पथक ताटकळत उभे राहिले.

तो म्हणाला, चावी भाडेकऱ्याने नेली, कुलूप तोडलं तर निघालं हे घबाड 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेच्या पथकाला एकाने काहीतरी लपवल्याची माहिती मिळाली होती. पथक त्याच्या घरी आलं तरी तो डगमगला नाही. कुलूप बंद असलेली खोली उघडण्याचा पथकाने लकडा लावला. तो म्हणायचा.. याची चावी भाडेकऱ्याने नेली आहे. ती आल्यावर उघडतो. तास झाला तरी चावी काही येईना, त्यामुळे पथक ताटकळत उभे राहिले.. चावी काही येत नसल्याचे पाहून पथकाने कुलूप तोडायला लावले. आत पाहतात तर मोठ्ठं घबाड.. त्यांचेही डोळे गरगरले. 

कारवाई अशी, अंमलबजावणी तशी

महापालिका कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक बंदी आहे. हा कायदा झाला तेव्हा पहिल्या आठ-दहा दिवस पथकाने कारवाई केली. परंतु नेमेचि येतो, पावसाळा... या उक्तीप्रमाणे ती शिथील झाली. मग जिकडे तिकडे प्लॅस्टीकच प्लॅस्टीक. दहा रूपयांचे सामान घेतले तरी पिशवी मिळते. काहींनी खरोखरच याची अंमलबजावणी केली. परंतु पिशवीसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जाऊ लागले. त्याचा भुर्दंड अर्थातच ग्राहकांना भोगावा लागत.

बोरूडे मळ्यात केली कारवाई

प्लॅस्टीक वापराचा सुळसुळाट झाल्याने महापालिका पथक सक्रीय झाले. त्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्या खोलीला कुलूप होते. कुलूप तोडल्यानंतर तब्बल 3 टन सिंगल प्लॅस्टीक सापडले. बोरूडे मळ्यातील पंचशीलनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. मनोज चंपालाल कासलीवाल यांच्या घरी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, स्वच्छता निरीक्षक परीक्षित बीडकर, तुकाराम भांगरे, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस, सुरेश वाघ, राजेंद्र सामल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. 

गुजरातहून आणला माल 
महाराष्ट्रात सहजासहजी प्लॅस्टीक मिळत नाही. कासलीवाल यांच्या घरी सापडलेले प्लॅस्टीक हे गुजरातहून आणलेले आहे. तेथे प्लॅस्टीक निर्माण करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना सप्लाय करतात. बंदी असतानाही हा व्यवहार केला जातो. कासलीवाल यांनीही तेथूनच माल आणल्याची कबुली दिली. छोटे दुकानदार, भाजीपालाविक्रेते, फळ दुकानदार यांना त्या पिशव्या विकल्या जायच्या, अशी माहिती सारसर यांनी दिली.