पुन्हा भरला येड्यांचा बाजार ःमहापालिका करायला गेली एक, झालं भलतंच

Ahmednagar Municipal Corporation's decision to vegetable market is wrong
Ahmednagar Municipal Corporation's decision to vegetable market is wrong

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात नागरिकांना भाजीपाला सहज उपलब्ध व्हावा म्हणून महापालिकेने नगर शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र महापालिकेचा हा निर्णय उलटा पडला आहे. नागरिकांनी भाजी घेण्यासाठी चौकाचौकात मोठी गर्दी केली आहे.

भाजी मार्केटमधील गर्दी होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने प्रत्येक भाजी विक्रेत्याला ओळखपत्र घेऊन त्यांना शहरातील मोठ्या चौकात जागा देण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भातील बैठक काल महापालिकेत झाली. या निर्णयामुळे शहरातील मोठ्या चौकात नागरिकांना सहज भाजी उपलब्ध होत आहे. भाजी विक्रेत्यांना ओळखपत्र दिल्यामुळे त्यांनाही मार्केटयार्ड मधून सहजपणे भाजी विकत घेऊन चौकात आणता येत आहे. मात्र महापालिकेचा गर्दी टाळण्यासाठीचा हा निर्णय अंगलट आला आहे.

महापालिकेने परवानगी दिल्यामुळे चौकाचौकात भाजी विक्रेते बसत आहेत. हे भाजीविक्रेते कोणताही सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. त्यामुळे त्यांच्याजवळ येणारी ग्राहकही सोशल डिस्टन्स न पाळता गर्दी करून उभे राहत आहेत. त्यामुळे महापालिकेचा गर्दी टाळण्यासाठीचा हा नवा फंडा महापालिकेच्या अंगलट आला काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

चौकात झालेल्या गर्दीची माहिती लोकांनी पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवला. त्यानंतर सर्वच भाजीबाजार सोडून पळाले. भाजीसाठी जीव गमावण्याची वेळ आली तरी लोकांना अजूनही कोरोनाच्या साथीचे गांभीर्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com