शेवगावात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या

सचिन सातपुते
रविवार, 18 जून 2017

आप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), सुनंदा आप्पासाहेब हरवणे (वय 48), स्नेहल आप्पासाहेब हरवणे (वय 18) आणि मकरंद आप्पासाहेब हरवणे (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. 
 

शेवगाव - नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील विद्यानगर भागात शनिवारी रात्री एकाच कुटूंबातील चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), सुनंदा आप्पासाहेब हरवणे (वय 48), स्नेहल आप्पासाहेब हरवणे (वय 18) आणि मकरंद आप्पासाहेब हरवणे (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. 

या सामुहिक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले अप्पासाहेब गोविंद हरवणे हे येथील मिरी रस्त्यावरील विद्यानगर भागात राहतात. आज रविवारी सकाळी 7 वाजता दुधवाला दूध देण्यासाठी आला असता दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने परिसरातील नागरिक त्यांच्या घरात गेल्यावर हे सर्वजण मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. सर्वजणांची हत्या एकाच प्रकारे गळे चिरून झाली असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हरवणे कुटुंबातील अभियांत्रिकीत शिक्षण घेणारी दुसरी मुलगी शितल परवा संगमनेर येथे गेल्याने ती मात्र या हत्यासत्रातून वाचली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून श्वानपथक, ठसे तज्ज्ञ बोलावून असून पंचनामा करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास
अविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव​
कन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार​
कुबट कोपऱ्याचं भान...
दार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)​
कर्जमाफी, निकष आणि भोग​
#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन​

Web Title: Ahmednagar news Four people killed in Shevgaon