नगरः श्रीगोंदयात जिल्हा सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

संजय काटे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शाखेत होती अठरा लाखाची रोकड; आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत बाहेर लोकांची वर्दळ सुरू झाल्याने चोरटे काम अर्धवट ठेऊन पसार झाले. बँकेत त्यावेळी अठरा लाखाची रोकड होती.

नगर-सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या घोगरगाव येथील या शाखेत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शटर उचकटून दोन जण आत गेले तर दोघे बाहेर थांबले. मात्र, चोरी करण्याची वेळ चुकीची असल्याने अनर्थ टळला. कारण दोघे जण बँकेत गेल्यावर काही वेळात बाहेर लोकांची वर्दळ सुरू झाल्याने चोरट्यांनी चोरीचा इरादा बदलून तेथून पलायन केले.

चोरट्यांची सगळी हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरीचा प्रयत्न जरी फसला असला तरी कालच्या रात्री बँकेत अठरा लाखाची रोकड होती ती वाचली, अशी माहिती बँकेचे तालुका विकासअधिकारी भरत इथापे यांनी सांगितले. बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी इथापे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी भेट दिली.

Web Title: ahmednagar news shrigonda the attempt to break the bank failed