भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आमरण उपोषण

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) - भिमा सहकारी साखर कारखान्याच्या (टाकळी सिंकदर) सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या ता. ३० जुलै पासुन, सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास विविध राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचा पाठींबा वाढत आहे. 

अंतिम देयके व त्यावरील करारानुसार वाढीव १५ टक्के रक्कम द्यावी यासाठी मोहोळ तहसिलसमोर दि. ३० जुलैपासुन सुरु असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असुन, अनेक जणांची प्रकृती खालावत चालली आहे. या मागण्या बाबत कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक महेश सगरे व व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांची शिष्टाई असफल ठरली आहे. 

या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रास्त व हक्काच्या मागणीस पाठींबा व्यक्त करण्यासाठी भिमाचे माजी चेअरमन सुधाकरपंत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे प्रदेक्षाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य अंजिक्यराणा पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पवार, तालुकाध्यक्ष संजय (काका) देशमुख, राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा भिमाचे विद्यमान संचालक प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या यशोदा कांबळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आदीसह अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तीनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी उपस्थीत राहत पाठींबा व्यक्त केला आहे. 

यावेळी दिलावर मणेरी, शिवाजी कोंडकर, शिवाजी शिंदे, अशोक गोडाळ, विष्णु जाधव, राजाभाऊ गायकवाड, नवनाथ गंभीरे, जाबुवंत शेटे, शिवाजी म्हमाणे, दगडू भोसले आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

Web Title: Ailing fasting for the wages of the retired employees of the Bhima Cooperative Sugar Factory