हवेत गोळीबार केलेली एअरगन जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर : विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्या राजू प्याटी यांची एअरगन गुन्हे शाखेने जप्त केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार जनतेला खोटे बोलत असून त्यांच्या घोषणा फक्त जाहिरातीपुरत्या आहेत. स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे फेल गेले आहे. लोक कोठेही शौचास बसतात. यासह इतर विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू प्याटी यांनी 9 मे रोजी चार हुतात्मा पुतळा परिसरात आंदोलन केले होते.

हे सरकार हवेत गोळीबार करणारे आहे, असे म्हणत प्याटी यांनी एअरगनने हवेत गोळीबार केला होता. याबाबतची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि गुन्हे शाखेतून प्याटी यांना समजपत्र आले. कार्यालयात भेटण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी एअरगन जप्त केली आहे. मी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य केले आहे. स्पर्धेसाठी एअरगन आवश्‍यक असून ती परत मिळावी अशी मागणी केली आहे.

Web Title: air gun seized by police for open firing