आजरा - कोल्हापूर एसटीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथे हे एसटी बस थांबलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात 32 जण किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. 

कोल्हापूर - गोकुळ शिरगाव येथे हे एसटी बस थांबलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात 32 जण किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. 

आजरा - कोल्हापूर ही एसटी बस सकाळी सव्वादहाच्या सुमारास आजरा येथून निघाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास गोकुळ शिरगाव येथे या बसला अपघात झाला. मोटार सायकल आडवी आल्याने त्याला चुकवण्याच्या नादात बसचे स्टेरिंग अचानक जाम झाले. त्यामुळे बस रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये बसमधील सुमारे 32 प्रवासी जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajara Kolhapur ST accident on HIghway