अजिंक्‍यतारा बालवीरांकडून सर! (व्हिडिओ)

अजिंक्‍यतारा बालवीरांकडून सर! (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सातारा - निरभ्र आकाश, वाऱ्याच्या गार झुळकांतून जाणवणाऱ्या गुलाबी थंडीत बालचमूंसह सर्वांचाच सळसळता उत्साह आज अजिंक्‍यताऱ्याच्या पायथ्यापासून बुरुजापर्यंत ओसंडून वाहत होता. हिरव्या हिरव्या वनश्रीतून भगवे झेंडे नाचवत बालवीरांनी बघता बघता किल्ला अजिंक्‍यतारा सर केला. निमित्त होते... सजग फाउंडेशनने आयोजिलेल्या राजधानी ॲडव्हेंचर रन या हिस्टॉरिकल ॲडव्हेंचर रनचे. 

तालीम संघाच्या मैदानावर पोलिस उपअधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते ‘सजग’च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रनला प्रारंभ झाला. हातात भगवे झेंडे घेतलेले बालचमू शाहू चौकातून चार भितींचा चढ पार करुन किल्ले अजिंक्‍यताराच्या दिशेने धावू लागताच आपोपाच त्यांच्या तोंडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी जय शिवाजी’ या जयघोष सुरू झाला.

बघता बघता मुला-मुलींनी पायथ्याच्या मंगळाईचे अंतर कापून किल्ले अजिंक्‍यताऱ्याचे दिशेने कूच केले. गुलाबा थंडीतही या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. चढाचा रस्ताही ते प्रारंभीच्या उत्साहानेच चढत होते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारास अभिवादन करून मुले पुन्हा पायथ्याच्या दिशेने धावू लागली. मध्यावर ढोल- ताशांच्या गजरात त्यांना प्रोत्साहित केले जात होते. अल्पावधीतच मुला-मुलींनी तालीम संघ मैदानावर पोचत आपल्या पालकांची शाबासकीची थाप पाठीवर घेतली. 

कमॉन कमॉन...यू कॅन डू इट 
या रनमध्ये अंध व दिव्यांग मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. या गटाची रन सर्वांत शेवटी सोडण्यात आली. चार भिंतींच्या टप्प्यावरून पुढे जाताना या मुलांना किल्ल्यावरून खाली येणारे नागरिक कमॉन कमॉन...यू कॅन डू इट असे टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होता. या मुलांमधील आत्मविश्‍वास वाढत होता व ते जिद्दीने अंतर पार करण्यासाठी धावत होते.

Web Title: Ajinkyatara Fort Child Adventure Run