‘अजिंक्‍यताऱ्या’वर विजेविना अंधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सातारा - साताऱ्याची अस्मिता, एकेकाळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेला अजिंक्‍यतारा किल्ला वीजबिल भरण्यासाठी कोणी ‘नाथ’ मिळतोय का? याची वाट पाहात आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये १७ लाख रुपये खर्चून खांब, डीपी, वीज वाहक वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, हा किल्ला त्रिशंकू भागात असल्याने वीजबिल भरण्यास कोणी वाली मिळत नाही. यामुळे पथदिव्यांचे काम पूर्ण असूनही किल्ला अंधारलेलाच आहे. 

मराठ्यांची राजधानी म्हणून अजिंक्‍यतारा किल्ल्याचा नावलौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला पाहण्यासाठी दररोज पर्यटक येत असतात, तसेच किल्ल्यावर नित्यनियमाने फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र, किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. विविध नागरिक, संस्था व संघटनांनी या रस्त्याची डागडुजी करून सुरक्षिततेसाठी पथदिवे बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पथदिवे, विद्युत यंत्रणा बसविण्यासाठी १७ लाख रुपये मंजूर केले. त्यातून मंगळाई देवी मंदिर येथून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत सुमारे ३३ पोल, डीपी, विद्युत वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. हे काम फेब्रुवारी, मार्चमध्ये पूर्णत्वाला केले; पण हे काम होऊनही किल्ल्यावर उजेड काही पडला नाही. परिणामी, पहाटे फिरण्यास येणाऱ्या लोकांची अडचण होत आहे.

पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यावर ९४ बल्ब बसविण्यासाठी पंचायत समितीच्या सेस फंडातून निधी देणार आहे. जिल्हा परिषदेने हे वीजबिल भरावे, यासाठी पाठपुरावा करत आहे.
- आशुतोष चव्हाण, पंचायत समिती सदस्य, गोडोली गण

Web Title: Ajinkyatara Fort Electricity Issue