अजित पवार, छगन भुजबळ यांना अजून भाजपमध्ये कुठे घेतले : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

शिवसेना-भाजपमध्ये जाण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची झुंबड उडाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना सेना-भाजपमध्ये प्रवेश मिळू लागला आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले भ्रष्टाचाराचे आरोप तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांच्यावर आहेत. आम्ही त्यांना कुठे पक्षात घेतले आहे.

सोलापूर : आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कोणत्याच भ्रष्ट नेत्याला भाजमध्ये घेतले नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूरात सांगितले. 'अजित पवार, छगन भुजबळ यांना अजून भाजपमध्ये कुठे घेतले', असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

शिवसेना-भाजपमध्ये जाण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची झुंबड उडाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना सेना-भाजपमध्ये प्रवेश मिळू लागला आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले भ्रष्टाचाराचे आरोप तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांच्यावर आहेत. आम्ही त्यांना कुठे पक्षात घेतले आहे. पाच वर्ष भाजपमधील नेत्यांना संधी दिली. सरतेशेवटी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील व शिवसेने जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेऊन मंत्रिपद दिले.  या दोन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नसल्याचे स्पष्टीकरणही महसूलमंत्री पाटील यांनी दिले. सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 

ज्यांच्यावर आरोप आहेत आणि आम्ही त्यांना पक्षात घेतले अशा एका तरी व्यक्तीचे नाव सांगा असा प्रतिप्रश्नच  चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar and Chhagan Bhujbal have not yet joined BJP says Chandrakant Patil