मराठा मोर्चामुळे मुख्यमंत्र्यांना हटविण्याच्या हालचाली?- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

भाजपसोबत आपला पक्ष सडला, हे समजायला उद्धव ठाकरे यांना 25 वर्षे लागली.'' केंद्रात मंत्री असताना शरद पवार यांनी दूध, साखर आणि अन्य शेतमालाचे भाव पडू दिले नाही. ग्राहक आणि शेतकऱ्यांत समन्वय साधला. नोटाबंदीमुळे ग्रामीण भाग उद्‌ध्वस्त झाला.

कोपरगाव - सध्याच्या भाजप-शिवसेना सरकारच्या काळातच मराठा समाजाचे मोर्चे का निघाले, या मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीतून सुरू होत्या कां? कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा का होत नाही, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणेचे काय झाले, शिवसेनेसह सर्वच घटक पक्षांचे नेते सत्ताधाऱ्यांवर नाराज कसे, असे प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उपस्थित केले. 

ग्रामीण भागात आपल्या सर्वांची शेतकरी ही एकच जात असल्याचेही ते म्हणाले. कोपरगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत शनिवारी बोलताना पवार म्हणाले, ""पुण्यात "मोका'चे आरोपी, वाळू, लॅंड माफिया यांना भाजपमध्ये घेऊन पावन केले. सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडून आल्यावर गुंडांना सुधारण्याची भाषा करतात.

भाजपसोबत आपला पक्ष सडला, हे समजायला उद्धव ठाकरे यांना 25 वर्षे लागली.'' केंद्रात मंत्री असताना शरद पवार यांनी दूध, साखर आणि अन्य शेतमालाचे भाव पडू दिले नाही. ग्राहक आणि शेतकऱ्यांत समन्वय साधला. नोटाबंदीमुळे ग्रामीण भाग उद्‌ध्वस्त झाला.

दोन हजाराची नोट काढून काळ्या पैशाला उत्तेजन देण्याचे काम मोदी सरकारने केले. त्यांनी केवळ जाहिरातबाजीवर पंधराशे कोटी रुपये खर्च केले, अशी टीका पवार यांनी केली. वीज उत्पादनात राज्य स्वयंपूर्ण असताना शेतीला दिवसा वीजपुरवठा का केला जात नाही, असेही त्यांनी विचारले. या वेळी माजी आमदार अशोक काळे, काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, राजेश परजणे, चैताली काळे, आदी उपस्थित होते.

Web Title: ajit pawar criticize devendra fadnavis