दोन्ही देशमुखांना कर्तृत्व दाखवता येत नाही : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

सोलापूर : सोलापूरचे पावित्र्य सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या भांडणामुळे कमी झाले आहे. दोन्ही देशमुखांना त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवता येत नाही, ही सोलापूरकरांची शोकांतिका आहे. ज्या सोलापूरकरांनी तुम्हाला संधी दिली त्यांना कशाला वेठीस धरता? दोन्ही मंत्र्यांवरच कारवाई करा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपापल्या भाषणातून आज हल्लाबोल आंदोलन सभेत केली. 

सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने आज सायंकाळी नॉर्थकोट मैदानावर झालेल्या सभेत अजित पवार व धनंजय मुंडे बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयदेव गायकवाड, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार युन्नूसभाई शेख, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, निरीक्षक प्रदीप गारटकर, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, महापालिका गटनेते किसन जाधव, माजी अध्यक्ष मनोहर सपाटे, महेश गादेकर उपस्थित होते. 
अजित पवार म्हणाले, ऐन निवडणुकीच्या काळात सहकारमंत्री देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेची रक्कम सापडली. त्याची चौकशी सहकार विभागातीलच डीडीआर पेक्षाही कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी केली. सहकारमंत्र्यांच्या संस्थेची चौकशी सहकार विभागातील कनिष्ठ अधिकारी कसा करेल? त्याला त्याची नोकरी महत्त्वाची असणार असा टोलाही पवार यांनी लावला. 

अजित पवार म्हणाले... 
* अग्निशामक केंद्राच्या ठिकाणी सहकारमंत्र्यांनी बंगला बांधला, आपत्ती आल्यास काय करणार 
* तूरडाळ भरण्याच्या ठेक्‍यात गैरव्यवहार 
* भाजप-शिवसेनेचे मंत्री अधिकाऱ्यांना म्हणतात सर...सर 
* निवडणूक टाळून सोलापूर बाजार समितीत हुकूमशाही 
* मध्य प्रदेश सरकारने राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन महाराजांचे आंदोलन गुंडाळले 

धनंजय मुंडे म्हणाले.... 
* सोलापूर महापालिका कुरतडून खाण्यासाठीच देशमुखांची भांडणं 
* मुख्यमंत्री साहेब महापालिका काय बरखास्त करता, देशमुखांची मंत्रिपदे बरखास्त करा 
* शरद पवारांवर टीका करायची मुख्यमंत्र्यांची लायकी नाही 
* राज्याच्या 16 घोटाळेबाज मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी करा 
* दिल्लीचा रिंगमास्टर आल्याने मुख्यमंत्र्यांना भाजप महामेळाव्यात दिसली जनावरं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com