हिंमत असेल तर घ्या ना निवडणुका - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

सोलापूर - यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी महाराष्ट्रात उभा केलेला सहकार, पणन मोडीत काढण्याचे काम राज्य सरकार करू लागले आहे. बाजार समिती संचालकांचा कालावधी पूर्ण झाल्यावर निवडणुका घेण्याऐवजी त्या ठिकाणी प्रशासक आणून आपली पिलावळ बसविण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. "प्रशासक काय नेमता, हिंमत असेल तर घ्या ना निवडणुका', असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला व सहकारमंत्र्यांना दिले.

उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्या वेळी ते बोलत होते.

काही ठिकाणी एक रुपयांमध्ये जेवण दिले जाते. चांगल्या चालत असलेल्या बाजार समित्या विनाकारण बरखास्त करण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. आता तर खासगी बाजार समित्या होऊ लागल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर जबाबदार कोण? असा सवालही अजित पवारांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकी कोणती धर्मसत्ता म्हणजे हिंदू धर्मसत्ताच अपेक्षित आहे का? बौद्ध, मुस्लिम, शीख या धर्मसत्तांना काय स्थान आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

अजित पवारांचे टीकास्त्र
साखर 35 रुपये अन्‌ तूरडाळ 200 रुपये यांच्या काकांनी केली होती का?
महाराष्ट्राची अधोगती होऊ लागली
राज्यातील विविध समाज अस्वस्थ असताना राज्य सरकार निष्क्रिय
मंत्रीच शिवराळ बोलू लागल्याने न्याय मागायचा कोणाकडे
प्रत्येक गोष्ट न्यायालयातून सांगावी लागते.

Web Title: ajit pawar speech in solapur