आकडे कर्जमाफीचे, की मटक्‍याचे काढताय? - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘‘कर्जमाफीचा विचार करत आहोत, आमची आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा सांगितले. आता मटक्‍याचे आकडे काढताय का? आम्ही सामंजस्यपणाने कर्जमाफी मागत आहोत. आता पाझर फुटेल, मग फुटेल; मात्र त्यांना पान्हा फुटायलाच तयार नाही. ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना,’ अशी अवस्था भाजप सरकारच्या कारकिर्दीत राज्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.’’ 

श्री. पवार म्हणाले, ‘‘राजीव गांधी यांच्यानंतर ३० वर्षांनी नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत मिळाले. मात्र, तीन वर्षांत एकही प्रश्‍न त्यांनी सोडवला नाही. लोकांना मोहिनी घालण्याचे काम करून ते मते घेतात आणि नंतर सर्व विसरून जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढल्या. उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलांत वाढ केली आहे. हे ‘अच्छे दिन’ आहेत का?  मंत्री म्हणताहेत तुरीचे नियोजन चुकले. मग, तुम्ही तेथे शेतकऱ्यांना मातीत घालायला बसलाय का? तूर विक्रीसाठी आली, त्यावेळी सरकारने ती खरेदी बंद केली. हे सरकार बेजाबदार, असंवेदनशील, शेतकरी विरोधी आहे. जिल्हा बॅंकेत लाखो रुपयांच्या नोटा पडल्या आहेत. त्याचाही निर्णय नाही.

सरकारला त्यासाठी योग्य भाषेत समजवावे लागेल. त्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करावा लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी.’

कॅबिनेट घेण्याची मला संधीच नाही 
आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख परदेशात गेल्याने त्यांना कॅबिनेटची बैठक घेण्याचा मान एकदाच मिळाला. मला मात्र एकदाही तो मान मिळाला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बघत श्री. पवार यांनी म्हटल्यावर उपस्थितांत हशा पिकला.

बियाणे, बेणं कळतं का ? 
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतीचा काही संबंध आहे का? माझा पाच पिढ्यांचा शेतीशी संबंध आहे, असे मुख्यमंत्री सारखे सांगतात. मात्र, त्यांना बियाणे आणि बेणं यातील फरक कळतो का, असा सवाल करीत श्री. पवार यांनी सरकारची खिल्ली उडवली.

Web Title: ajit pawar talking on loanwaiver