अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यानचा लोकार्पण सोहळा संपन्न

राजशेखर चौधरी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यानचा लोकार्पण सोहळा आज १५ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता अन्नछत्र मंडळाच्या विश्चस्त तथा माजी नगरसेविका अलका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या श्री स्वामी समर्थ वाटिका व बालोद्यानचा लोकार्पण सोहळा आज १५ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता अन्नछत्र मंडळाच्या विश्चस्त तथा माजी नगरसेविका अलका भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता खोबरे या होत्या. अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, अर्पिता भोसले, संदीप फुगे, अनुया फुगे, मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, सोलापूरचे उदयान विद्या सल्लागार रमेश दुधनी, विश्वस्त संतोष भोसले, विजयकुमार हंचाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ वाटिका हे पहाटे ५ ते सकाळी १० नंतर सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये कारंजा, मुलांना मनोरंजनासाठी घसरगुंडी त्याचप्रमाणे हरिण काळवीट, कासव, मगर, घोडा आदी प्राण्यांचे शिल्प उभारण्यात आले आहे.वयोवृध्दांना आराम बसण्यासाठी वाटिकेमध्ये विविध ठिकाणी बाकडे बसविण्यात आलेले आहेत. स्वच्छ हवे बरोबरच सुंदर गाणी आणि भाव भक्तीगीत संगीत ऐकता यावे यासाठी तेथे  अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.यावेळी अन्नछत्र मंडळाच्या विश्चस्त अलका भोसले म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सर्व विश्वस्तांनी परगावहून आलेल्या स्वामी भक्तांना महाप्रसादाबरोबरच व्यायामाची सोय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्राचा अध्यापन व्हावे यासाठी गडकिल्ले-शिवसृष्टी, धातुचित्र शिल्पसृष्टीसह लहान मुलांना व वयोवृध्दांना विरुंगळा म्हणून खेळता यावे व बसता यावे व स्वच्छ हवा घेता यावे यासाठी श्री स्वामी समर्थ वाटिकेचे निर्माण केले आहे. तरी स्वामीभक्तांनी व तसेच अक्कलकोट शहर व तालुकावासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी अलका भोसले यांनी केले.यावेळी लाला राठोड, अ‍ॅड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, गणेश भोसले, मनोज निकम, राजु नवले, निखिल पाटील, संजय गोंडाळ, सनी सोनटक्के, योगेश पवार, आतिष पवार, सिध्दप्पा पुजारी, विठ्ठल रेड्डी, शहाजी यादव आदीसह बहुसंख्य सेवेकरी, कर्मचारी व स्वामीभक्त उपस्थित होते.

Web Title: Akkalkot - inauguration ceremony of Sri Swami Samarth Vetika and Balodin