अन्नछत्र मंडळात भावभक्ती गीतांचा परिमळ दरवळला

राजशेखर चौधरी
मंगळवार, 24 जुलै 2018

स्वरपूष्प या कार्यक्रमात गायञी मंञ, स्वामी समर्थ मंञ, मन मेरा मंदिर आदींसह भक्ती गीतांनी वातावरण गंधीत गेले.  भावभक्ती गीतांचा परिमळ दरवळला.

अक्कलकोट : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या कार्यक्रमाचा आजच्या पुष्पाचा शुभारंभ भारतीय संस्कृतीच्या प्रचारक मोहिनी राव, संगिता भोसले, स्वप्ना माने, उज्वला भोसले ,सोनाली महिंद्रकर,क्रांती वाखडे या विविध क्षेञातील मान्यवर महिलांच्या हस्ते समर्थ प्रतिमा पूजन आणि नंदादीप प्रज्वलीत करून करण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ विधीज्ञ अॅड. धनंजय माने, रेखा माने,एजाजहूसेन मुजावर यांचा अन्नछञ अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर राजेश जगताप,विरूपाक्ष कुंभार, रमेश भंडारी, रजाक सय्यद, अल्ताफ शेख, सतीश राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सातवे पूष्प अनुराधा पौडवाल यांनी गुंफले. स्वरपूष्प या कार्यक्रमात गायञी मंञ, स्वामी समर्थ मंञ, मन मेरा मंदिर आदींसह भक्ती गीतांनी वातावरण गंधीत गेले.  भावभक्ती गीतांचा परिमळ दरवळला.

या भक्तीसंगमास स्वमभक्तांसाह शहरवासियांनी उदंड प्रतिसाद लाभला.या वेळी अन्नछञ कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, भाऊ कापसे,विश्वस्त अलका भोसले, अर्पिता भोसले, अनुया फुगे, अनिता खोबरे, डाॅ. आसावरी पेडगांवकर, मनिषा माळशेट्टी,गौरी दातार, सुनीता किरनळी, प्रमिला देशमुख, मिनल शहा, कोमल क्षिरसागर, श्वेता मालप, लता मोरे,  वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, सुरेश सुर्यवंशी, छोटू शिरसाठ, अनिल कुर्ले, मैनोद्दीन कोरबू, बाळ देसाई, रोहीत खोबरे प्रशांत साठे,पिंटू धोडमनी, सनी सोनट्टके, दत्ता माने,लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, गणेश भोसले,मधुकर गोंडाळ, सुरज निंबाळकर, स्वप्निल मोरे, राहूल निंबाळकर, प्रविण घाटगे, सागर गोंडाळ,आकाश गडकरी यांच्यासह  हजारो भक्तजन उपस्थित होते.सूञसंचालन श्वेता हूल्ले यांनी केले.

Web Title: akkalkot mandir programmme