अक्कलकोट बस स्थानकावर बचत गटाच्या स्टॉलचा शुभारंभ

राजशेखर चौधरी
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

अक्कलकोट (सोलापूर) : एसटी महामंडळाच्या दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजने अंतर्गत अक्कलकोट बसस्थानकावर सोमवारी (ता. 11) सकाळी १० वाजता जेऊर (ता. अक्कलकोट) येथील जीवनज्योती महिला बचत गट आणि अक्कलकोट स्टेशनच्या प्रियदर्शिनी महिला बचत गट यांच्या स्टॉलचे उद्धाटन उत्तरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अक्कलकोटचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आगार प्रमुख विवेक हिप्पळगांवकर, स्थानक प्रमुख संजय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजनाने फित कापून करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य एसटीमहामंडळाच्या बचत गट स्टॉल योजनेतून महिलांना चांगला रोजगार मिळेल तसेच त्यांनी उत्पादित केलेली वस्तू प्रभावीरित्या लोकांपर्यत पोचवण्याची ही चांगली संधी महामंडळानी त्यांना दिली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा चांगला लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.

यावेळी पोलिस निरीक्षक बंडगर म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यात बचत गटांचे काम चांगले आहे, त्यामुळे राज्यात परिवहन खात्याने हा एक चांगला उपक्रम राबविला आहे. त्याचा फायदा आता ग्राहकांनी घ्यावा. हे स्टॉल २२ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले आणि तेही केवळ नाम मात्र एक रुपया शुल्क आकारून ही सुविधा महामंडळाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. या स्टॉल मध्ये त्यांनी दिवाळी फराळ, साबण, निरमा पावडर, सॅनिटरी नॅपकिन इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. स्टॉल दहा दिवस चालू  राहणार आहेत.

यावेळी वनिता तंबाके, रुपाली कणमुसे, केशव मोरे, परमेश्वर जावळे, वाहतुक नियंत्रक सुधाकर काळे, सैपन पठाण, पंढरीनाथ बेळ्ळे, वेदेश अवधानी, विश्वनाथ मठपती, इरणा कणमुसे, सुनील तंबाके यांच्यासह इतर मान्यवर व बचत गटातील सदस्य उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: akkalkot news Launch of the savings group stall at Akkalkot bus station