सैराटमधील "आर्ची'ला मिळाले 66.40 टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

अकलूज - 'आर्ची' या नावाने महाराष्ट्रभर ओळख पावलेली "सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीला 66.40 टक्के गुण मिळविले आहेत.

अकलूज - 'आर्ची' या नावाने महाराष्ट्रभर ओळख पावलेली "सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीला 66.40 टक्के गुण मिळविले आहेत.

तिने येथील जिजामाता कन्या प्रशालेतून बहिःस्थ विद्यार्थी परीक्षा अर्ज भरला होता. सैराट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा ती सातवीत होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्या वेळी तिने नववीची परीक्षा दिली. ती दहावीला शाळेत येणार का याविषयी उत्सुकता होती. पण तिने बाहेरून परीक्षा दिली. सैराट चित्रपटासाठी अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिकही तिला मिळाले आहे. सैराटचा कन्नड भाषेत रिमेक झाला असून, त्यातही रिंकूने काम केले आहे.

Web Title: akluj news archi 66.40% marks in ssc board