नुकसान भरपाई न मिळाल्यास कोणताही कर भरणार नाही

सुनील पाटील
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी च्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेटे यांनी सर्व उद्योजकांनी व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली.

कोल्हापूर : पूर आणि अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक व्यापार आणि उद्योजकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या उद्योग आणि व्यवसायिकांना 100 टक्के नुकसान भरपाई दिल्याशिवाय कोल्हापूरमधील व्यापारी आणि उद्योजक जीएसटीसह कोणताही टॅक्स भरणार नसल्याचा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आज येथे दिला.

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी च्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेटे यांनी सर्व उद्योजकांनी व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली.

कोल्हापुरातील व्यापारी उद्योजकांचे एक हजार कोटींहून अधिक रुपयांची नुकसान झाले आहे. ही शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. गरगटे सारख्या व्यापाऱ्यांचे विक्रीसाठी आणलेल्या माल खराब झालेला पाहून हृदय विकाराने जीव गमवावा लागला. सरकारने आता व्यापाऱ्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही तर झालेल्या नुकसानीची 100% भरपाई दिली पाहिजे अशी मागणी करत सरकारने जर नुकसान भरपाई दिली नाही, तर मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोणताही व्यापारी उद्योजक जीएसटी किंवा इतर कर भरणार नाही अशी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akrosh morcha starts at Kolhapur