अख्खं कडेगाव हळहळल ; पट्टीचा पोहणाऱ्या अक्षयचा तलावात बुडून मृत्यू

akshay died  drowned in Kadegaon lake Sangli rescue team removed sangli marathi news
akshay died drowned in Kadegaon lake Sangli rescue team removed sangli marathi news

कडेगाव (सांगली) : येथील लघु पाटबंधारे तलावात बुडून अक्षय संभाजी माळी (वय-23,रा.कडेगाव) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.याबाबत संजय महादेव पिसे (रा.कडेगाव) यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात वर्दी दिली.


याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,

 सुतगिरणीला पाणी पुरवठा करणारी कडेगाव तलावातील पाण्यातील विद्युत मोटारीमध्ये बिघाड निर्माण झाला होता. विद्युत मोटार  दुरुस्त करण्यासाठी सूतगिरणीचे कर्मचारी आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कडेगाव तलावाकडे गेले होते. ही मोटार तलावात तीनशे फूट अंतरावर आत खोल पाण्यात होती. ती पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एअर बॅग व अन्य पाण्यात पोहतानाची साधने असताना अक्षय याने यापैकी काहीही न घेता थेट पाण्यात उडी घेतली. तो  आत तलावातील पाण्यात पोहत गेला.त्यानंतर त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला.यावेळी सूतगिरणीच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु पाणी जादा असल्याने  त्यामध्ये त्यांना यश आले नाही.अखेर पट्टीचा पोहणारा असूनही अक्षयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सांगलीच्या रेस्क्यू टीमने काढला मृतदेह बाहेर सागरेश्वर सुतगिरणीच्या इंजिनिअरिंग विभागात अक्षय माळी नोकरीस होता. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केला.परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही.तर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.अखेर रेस्क्यू टीमच्या पाणबुडीनी पाण्यात बुडालेला अक्षयचा मृतदेह बाहेर काढला.अक्षयचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती शहरांत कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.तर या घटनेने कडेगाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com