अक्षय औदुंबर गायकवाड याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

akshay
akshay

माढा (सोलापूर) - बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या पिग्मी एजंटचा मुलगा अक्षय औदुंबर गायकवाड याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. निवडीमुळे कुटुंबियांसह माढय़ातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. 

माढयातील मनकर्णा पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करणारे औदुंबर गायकवाड यांचा आर्थिक उत्पन्नाचा पिग्मी हाच एकमेव स्त्रोत आहे. त्यांच्या पत्नी सविता या शिलाईची कामे करून कुटुंबाला हातभार लावतात. मात्र मुलाला उत्तम शिक्षण देण्याच्या इराद्याने त्यांनी मुलाला पुण्याला स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी ठेवले. त्यांच्या मेहनतीला यश येत तिसऱ्या प्रयत्नात अक्षय पोलिस उपनिरीक्षकपदाची परिक्षा पास झाला. त्याच्या यशाचा आनंदोत्सव कुटुंबियांनी साजरा केला.

अक्षयचे माध्यमिक शिक्षण माढयातील सहकारमहर्षी गणपतराव साठे प्रशालेत झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कुर्डुवाडी नगरपालिकेच्या विदयालयात विज्ञान शाखेत झाले आहे. सांगोला येथे बी.सी.ए.ची पदवी घेतल्यानंतर त्याने पुणे येथे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, मनकर्णा पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी तसेच माढयातील ग्रामस्थांनी कुटुंबियांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com