भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा 

संतोष सिरसट
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजता धरणात दौंड येथून 53 हजार 990 क्‍युसेकने पाणी येत होते. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढणार असल्याने भीमा नदीमध्ये कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

उजनी धरण व्यवस्थापनाच्या उपविभागीय अभियंत्यांनी लोकांना इशारा देण्याबाबतचे पत्र आज उजनी धरण व्यवस्थापनाच्या कार्यकारी अभियंत्यास दिले आहे. भीमा नदीमध्ये यापूर्वीच वीर धरणातून सोडलेले पाणी आले आहे. त्यातच आता उजनी धरण 90 टक्‍यांच्या पुढे गेल्यानंतर पूरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून धरणातून भीमा नदीमध्ये कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी नदीपात्रातून काढून घ्याव्यात. त्याचबरोबर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून कोणत्याही प्रकारचे दळणवळण करू नये, अशा सूचना उजनी धरण व्यवस्थापनाने दिल्या आहेत. आज सायंकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 65.39 टक्के झाला होता. दौंडबरोबरच बंडगार्डन येथील विसर्ग 38 हजार 608 इतका होता. धरणातून कालव्यामध्ये तीन हजार, बोगद्यातून 900 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. 

शनिवारपर्यंत धरण होणार 100 टक्के 
पुणे जिल्ह्यातून येत असलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणात शनिवारपर्यंत (ता. 25) 100 टक्के भरण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीची तुलना करता धरण यंदा लवकरच 100 टक्के होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: alert to bheema river side citizens