ऑल इंडिया पोलिस गेम्स : तायक्वांदोत अविनाश पांचाळला रौप्यपदक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

सोलापूर : नवी दिल्ली येथे आयोजिलेल्या चौथ्या ऑल इंडिया पोलिस गेम्समधील तायक्वांदो स्पर्धेत 63 किलो वजन गटात बीडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश भरत पांचाळ याने रौप्यपदक पटकाविले असल्याची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली. 

सोलापूर : नवी दिल्ली येथे आयोजिलेल्या चौथ्या ऑल इंडिया पोलिस गेम्समधील तायक्वांदो स्पर्धेत 63 किलो वजन गटात बीडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश भरत पांचाळ याने रौप्यपदक पटकाविले असल्याची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली. 

Image may contain: Avinash Panchal, smiling, standing and text

 हेही वाचा - संचालक ओळखीचे आहेत, अनेकांना नोकरी लावलीय! 

पोलिस दलामध्ये तायक्वांदो खेळ प्रकाराचा समावेश झाल्यानंतर पोलिस दलात कार्यरत असलेल्या अविनाश पांचाळ, युवराज पोठरे, सचिन जायभाये या खेळाडूंनी मोठे यश मिळाले आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या ऑल इंडिया पोलिस गेम्समधील तायक्वांदो क्रीडा प्रकारात बीडचा आंतरराष्ट्रीय तायक्वांदोपटू अविनाश भरत पांचाळ याने रौप्यपदक पटकाविले आहे. अंतिम फेरीपर्यंत मजल मारून त्याने मिळवलेले हे यश उल्लेखनीय आहे. 

हेही वाचा - सावंत सेनेला मातोश्रीचा दणका; निष्ठावंतांकडे जबाबदारी
व्हिएतनाम व इराणमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व 
अविनाश पंचाळने यापूर्वी व्हिएतनाम व इराण या देशांमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय राष्ट्रीय पातळीवर त्याने पाच सुवर्णपदके पटकावली आहेत. शालेय, विद्यापीठ, फेडरेशन पाठोपाठ आता पोलिस गेम्समध्येही या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकली आहेत. अविनाश पांचाळ सोबत बीडच्या चॅम्पीयन्स तायक्वांदो ऍकॅडमीचा दुसरा राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू युवराज पोठरे यानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या खेळाडूंना बीड जिल्हा क्रीडा संकुलातील तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. अविनाश बारगजे व बन्सी राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. 

हेही वाचा- अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!
जिल्हा हर्ष पोद्दार, जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर, नितिनचंद्र कोटेचा, सुनील राऊत, दिनकर चौरे, भारत पांचाळ, जया बारगजे, मनेश बनकर, रमेश मुंडलीक, डॉ. विनोदचंद्र पवार, प्रा. पी. टी. चव्हाण, श्रीकांत पाटील, शशांक साहू, सचिन जायभाये, बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सर्व पदाधिकारी व वरिष्ठ खेळाडूंनी अभिनंदन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Police Games: Avinash Panchal Won silver in Taekwondo