वीज दरवाढ विरोधात सांगलीत सर्वपक्षीय आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

सांगली, ः लॉकडाउन काळातील अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी, तसेच चुकीची वीज बिले तातडीने दुरुस्त करून मिळावीत, त्यातील 50 टक्के बिल माफ करावे, या मागणीसाठी सांगली शहरच्या महावितरण कार्यालयासमोर बिलफाड आंदोलन तसेच निदर्शने करण्यात आली. सर्व पक्ष, विविध समाजिक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 
 
माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, प्रशांत भोसले, महेश खराडे, नितीन चव्हाण, विकास मगदूम, राहुल पाटील, आसिफ बावा, नितीन चव्हाण, उमेश देशमुख, ज्योती आदाटे, कामरान सय्यद, प्रमोद ओतारी, लालू मिस्त्री, तौसिफ मुन्सी यांनी महावितरण कार्यालयासमोर बिल फाडो तसेच निदर्शने केली.

निवेदनातील मागण्या अशा - लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यांचे एकत्रित बिल ग्राहकांना दिले. एकत्र मागणी केल्याने ग्राहकांना दुप्पट-तिप्पट बिल आल्याने ग्राहकांना वाढवून दिलेल्या बिलांचा शॉक बसला आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या बिलांमध्ये अनेक चुका व तफावती असल्याने सदर बिल ग्राहकांना नाहक आर्थिक त्रास सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाटलेली बिले दुरुस्त करावीत, वीज बिल आकारणी करताना योग्य तिमाही विभागणी करावी, वाढीव वापरालाही निवासी दर आकारावा, व्यावसायिक, उद्योजकांना वीज वापर बंद असल्याने बंद काळात लावलेले बिल कमी करावे, वीज नियामक मंडळाच्या सूचनेनुसार ग्राहकांचे शंका निरसन झाल्याशिवाय वीज कनेक्‍शन तोडू नयेत, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All-party agitation in Sangli against power tariff hike