आरोपींवर कडक कारवाई व श्रद्धांजलीसाठी उद्या सर्वपक्षीय सभा

All-party meeting tomorrow for stringent action and tribute to the accused
All-party meeting tomorrow for stringent action and tribute to the accused

मंगळवेढा : पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील खवे तील चौघाची निघृण हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सर्व पक्षांच्यावतीने मंगळवेढा बंद आयोजन करण्यात आले. यातील मृत प्रेताचे शवविच्छेदन रात्रीच केले. दुपारपर्यंत आरोपीस अटक करून मृतांच्या वारसाला मदत व शासकीय नोकरीची हमी दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. 

खवे, मानेवाडी, हुन्नुर येथील नातेवाईकानी आमदार भारत भालके याची मंगळवेढ्यातील कार्यालयात भेट घेतली. त्यांनीही याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगून मृतांच्या नातेवाईकाचे सांत्वन केले. तालुक्यातील 16 गावातील नाथपंथी डवरी समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर दामाजी पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी याबाबतचे निवेदन स्विकारले. दुपारनंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, शशिकांत चव्हाण, राजेन्द्र सुरवसे, औदुंबर वाडदेकर, शिवानंद पाटील, गौरीशंकर बुरकूल, मच्छिद्र भोसले, भैरू भोसले, गोरख भोसलेसहनाथपंथी डवरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा करून मृताच्या वारसाला दहा लाखाची मदत, राहण्यासाठी घर, शिक्षणाच्या योग्यतेनुसार शासकीय नोकरी, शासकीय ओळखपत्र, दोषीवर कडक कारवाईचे आश्वासन उपस्थित मृत नातेवाईकाना व समाजातील कार्यकर्त्यांना दिले.

दरम्यान प्रेत ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या येथील पोलीस व नातेवाईकांनी दुपारपर्यत आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांना आर्थीक मदत व शासकीय नोकरीची हमी दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. पण नातेवाईकांनी केलेल्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे प्रेत ताब्यात घेवून सायंकाळी 4.30 मंगळवेढ्याकडे निघाले असल्याचे पोलीसानी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com