दर्जेदार कामासाठी सर्वांचे सहकार्य हवे - महापौर हसिना फरास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

कोल्हापूर - थेट पाईपलाईन योजनेत कोणीही राजकारण आणू नये. योजनेच्या दर्जा चांगला रहावा, भ्रष्टाचारमुक्त काम पुर्ण व्हावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष, संघटना यांचे सहकार्य महापालिकेला अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचे काम कोणत्याही पक्ष, संघटनेने बंद पाडू नये, असे आवाहन महापौर हसीना फरास यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. 

थेट पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार होत असल्याच्या संशयावरुन अनेक आरोप, प्रत्यारोप होत आहेत. त्यात योजनेचा काम शिवसेनेने बंद पाडले. या पार्श्‍वभुमीवर शहरात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. 

या पार्श्‍वभुमीवर महापौर हसीना फरास यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘ योजना भ्रष्टाचारमुक्त आणि दर्जेदार व्हायला हवी. ही शहरवासियांची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे लढा द्यायला हवा. हा लढा देत असताना काम बंद पाडणे योग्य नाही. काम बंद पाडले तर कामाला उशीर होईल. पुन्हा काम सुरु करणे जिकीरीचे असते. त्यामुळे हे काम असेच अखंडीतपणे सुरु रहायला हवे. उद्या (शुक्रवारी) शिवसेना जिल्हाप्रमुख व कांही निवडक पदाधिकारी, आयुक्त यांच्यात समन्वयाची बैठक घेतली जाईल. या बैठकीत शिवसेनेच्या शंकाना अधिकाऱ्यांच्याकडून उत्तरे घेतली जातील, अशा तऱ्हेने या कामात शंकाच उरणार नाहीत. याची दखल घेतली जाईल.’’

तर सल्लागार, ठेकेदारला धडा शिकवू :  फरास
या योजनेचय कामात हयगय केली तर ठेकेदार आणि सल्लागार कंपनी यांना देखील धडा शिकविला जाईल. योजनेच्या कामाचा दर्जा हा चांगलाच असायला हवा. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाऊ नये. त्यामुळे ठेकदार कंपनी आणि सल्लागार कंपनीला तशी समज देण्यात येईल, असेही महापौर फरास यांनी स्पष्ट केले.

काम बंद पाडल्यास गुंतागुंत : शारंगधर देशमुख
थेट पाईपलाईन योजना हा शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. ४० वर्षे शहरवासियांनी या योजनेची वाट पहायली आहे. त्यामुळे ही योजना शहरासाठी महत्वाचीच आहे. त्यामुळे सर्व पक्ष, संघटना आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. दर्जासाठी त्यांनी जरुर आग्रह धरावा, लोकशाही मार्गाने संघर्ष करावा, पण योजनेचे काम बंद पाडू नये. काम बंद पाडले तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न यामध्ये निर्माण होणार आहेत, असे काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी सांगितले.

सोमवारी पाईपलाईन कामाची पाहणी
थेट पाईपलाईन योजनेचे काम पाहण्यासाठी सोमवारी (ता.१५) महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांचा संयुक्त दौरा काळम्मावाडीपर्यंत काढला जाणार आहे. या दौऱ्यात योजनेच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यात येईल. या पाहणी दौऱ्यामुळे प्रत्यक्ष कामाचे गांभीर्यही सर्वांच्या लक्षात येईल. त्यामुळे हा दौरा आयोजित केल्याचे महापौर फरास यांनी सांगीतले.

Web Title: all people support important for quality work