बेळगाव : सौंदत्ती डोंगराकडे जाणारे सर्व मार्ग बंद

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती रेणुका देवी मंदिरासह जिल्ह्यातील आठ मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली
Saundatti Renuka Devi Temple
Saundatti Renuka Devi Templesakal

बेळगाव : सौंदत्ती रेणुका देवी मंदिर (Saundatti Renuka Devi Temple)भाविकांसाठी बंद करण्यात आतर आहे. पण तरी देखील डोंगरावर गर्दी होऊ लागली आहे. डोंगराकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. त्यामुळे भाविकांना डोंगरापर्यंत जाऊन माघारी परतावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग (Corona infection)वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती रेणुका देवी मंदिरासह जिल्ह्यातील आठ मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली आहेत. १७ जानेवारी रोजी रेणुका देवीची यात्रा होणार होती. ती देखील रद्द करण्यात आली आहे. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश बजावला.

Saundatti Renuka Devi Temple
देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

त्यामुळे मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी मंदिराकडे जाणाऱ्या चारही मुख्य रस्त्यांची नाकाबंदी केली असून मंदिर परिसर भाविकांना बंद ठेवण्यात आला आहे. यात्रा जरी रद्द करण्यात आली असली तरी मंदिर व्यवस्थापनाकडून साध्या पद्धतीने शाकंभरी पौर्णिमेला धार्मिक विधी पूर्ण केले जाणार आहेत. व यावेळी देखील भाविकांना मंदिरात प्रवेश असणार नाही. दरवर्षी पौर्णिमा यात्रेला कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविक उपस्थित राहतात. याठिकाणी अनेक गावातील लोक एकत्र येऊन दोन ते तीन दिवस वास्तव्य करीत सामुहिक पडली भरतात. मात्र यंदा मागील वर्षाप्रमाणे यात्रा आणि देवीचे दर्शन बंद आहेत. तरी देखील भाविक डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करत असून सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक डोंगराच्या पायथ्याशी जमा होत आहेत. त्यांना डोंगरावर जाऊ दिले जात नसून पोलिस माघारी पाठवत आहेत.

याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. भाविकांनी घरातूनच देवीची आराधना करावी आणि मंदिर भाविकांना पुन्हा दर्शनासाठी खुले होईपर्यंत डोंगरावर येऊ नये. मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

-रवी कोटारगस्ती, सीईओ, रेणुका मंदिर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com