सर्व समाज घटकांनी घेतली मराठा समाजाची दखल

राजशेखर चौधरी
सोमवार, 30 जुलै 2018

अक्कलकोट : अक्कलकोट येथे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवारी बाजाराचा दिवस असताना देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनाला सर्व पक्ष आणि तालुक्यातील विविध 28  सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला होता. सकाळी सात वाजल्यापासूनच तरूणाचे जथ्ये आरक्षणाच्या घोषणा देत मोटरसायकल वरून विविध भागातून फिरत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.

अक्कलकोट : अक्कलकोट येथे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवारी बाजाराचा दिवस असताना देखिल कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनाला सर्व पक्ष आणि तालुक्यातील विविध 28  सामाजिक संघटनानी पाठिंबा दिला होता. सकाळी सात वाजल्यापासूनच तरूणाचे जथ्ये आरक्षणाच्या घोषणा देत मोटरसायकल वरून विविध भागातून फिरत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत होते.

सकाळी 11 वाजता बसस्थानकाजवळील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा निघाला. पाच हजारांचा जनसमुदाय घोषणा देत होता. खंडोबाची पूजा करून मोर्चाला प्रारंभ झाला. राजा शिवाजी चौक, विजय कामगार चौक, छञपती शिवाजी व्यापारी संकुल, एवन चौक, कमलाराजे चौक, जुना राजवाडा, फत्तेसिंह चौक, मेनरोड कापड बाजार मार्गे कारंजा चौक येथे जाहिर सभा घेण्यात आली. या मोर्चास मराठा समाजाचे प्रमुख जन्मेजय भोसले, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील, अमोल भोसले, महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, विलास गव्हाणे, दिलीप सिध्दे, बाळासाहेब मोरे, अविनाश मडिखांबे, सुरेश सुर्यवंशी, अरूण जाधव, योगेश पवार, अश्पाक बळोरगी, कीरण किरात,  मल्लिनाथ साखरे, अभय खोबरे, आयशा नदाफ, ताराबाई हांडे, बंदेनवाज कोरबू, श्रीनिवास सिंदगीकर, अल्लिबाशा अत्तार, प्रविण घाटगे, सुभाष गडसिंग, आकाश गडकरी, वैभव नवले, मनोज निकम, मनोज गंगंणे, मनोज इंगवले, दिलीप काजळे, रोहित निंबाळकर, दयानंद काजळे, व्यंकट मोरे, सद्दाम शेरिकर, गफूर शेरीकर, अप्पू पराणे, विश्वास निंबाळकर, छोटू शिरसाठ, राहूल निंबाळकर, सुजय साळुंखे, नरसिंह क्षिरसागर, सुरज निंबाळकर, केरबा होटकर, अप्पू पराणे, सुरेश कदम, नितीन मोरे, विजय माने, रमेश माने यांच्यासह पाच हजार लोक मोर्चात सहभागी होते.

कारंजा चौकात झालेल्या सभेत फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी आंदोलना मागची भूमिका विषद करून आमदार म्हेञे यांनी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा प्रसंगी आमदारकीचा राजिनामा द्यावा अशी मागणी केली. या वेळी दिलीप सिध्दे अरूण जाधव बाळासाहेब मोरे, अविनाश मडिखांबे, राज चव्हाण, राहूल रूही,
विकीबाबा चौधरी, महेश इंगळे, मल्लिकार्जून पाटील, आमदार सिध्दाराम म्हेञे यांनी सरकारवर चौफर हल्ला चढविला. हे केवळ घोषणाबाजी करणारे फसवे सरकार असल्याचे सांगून ते म्हणाले की प्रसंगी बाबासाहेब निंबाळकर यांच्या आवाहनानुसार राजिनामा सुध्दा देवू अशी घोषणा म्हेत्रे यांनी यावेळी केली. तहसीलदार दीपक वजाळे यांना निवेदन सादर करण्यात आले. सभेचे सुत्र संचलन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.

Web Title: All the social elements took the Maratha community's attention