मोहोळ - चार दिवसापासुन बंद असलेले सगळे व्यवहार सुरु 

राजकुमार शहा
मंगळवार, 22 मे 2018

मोहोळ - खंडाळी ता मोहोळ येथील तणाव आता पुर्णपणे निवळला असुन, गेल्या चार दिवसापासुन बंद असलेली दुकाने व्यावसायीकांनी उघडल्यामुळे नित्याचे व्यवहार सुरु झाले. याबाबत उपाविभागीय पोलीस आधीकारी अभय डोंगरे यांनी माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणुन डोंगरे अद्यापही खंडाळीत ठाण मांडुन आहेत. तर मोठा पोलीस बंदोबस्त शिघ्रकृती दल व जलद प्रतिसाद दलाच्या तुकडया तैनात आहेत. 

गेल्या आठरा मे रोजी खंडाळीत महापुरुषांचे फलक काढण्याच्या कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यातच किरकोळ दगड फेक व इतर अप्रिय घटना घडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभु अप्पर, पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रितम यावलकर, प्राधिकारी सचिन ढोले यांनी खंडाळीला तातडीने भेट दिली.

दरम्यान, पोलीसांनी परिस्थीतीची पाहणी करून नागरीकांना शांततेचे आवाहन केले होते. तर अधिक्षक प्रभु यांनी घटना स्थळाची पाहणी करून दोन्ही गटाच्या  नागरीकांचे म्हणणे ऐकुण घेतले. सकल मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र गायकवाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनीही खंडाळीला भेट देऊन नागरीकांना शांततेचे आवाहन केले होते. या प्रकरणी परस्पराविरोधात मोहोळ पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: All transactions that have been closed for four days are started