खासदार शेट्टींबरोबर "ऑल इज वेल' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सातारा - आपल्याकडे एकापेक्षा अधिक मंत्रिपदांचा कार्यभार दिल्याबद्दल खासदार राजू शेट्टींची कोणतीही नाराजी नाही. आम्ही 22 वर्षे एकत्र आहोत. ज्यांनी ही अफवा पसरविली आहे, त्यांनी किमान इतकी वर्षे त्यांच्या पक्षासोबत प्रामाणिक राहावे, असा टोला कृषी व पणन तथा येथील सहपालकमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज लगावला. दरम्यान सहपालकमंत्री म्हणून काम करताना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीसाठी आम्ही झटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मंत्री सदाभाऊ खोत यांनी "सकाळ' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी सहायक वृत्तसंपादक राजेश सोळसकर यांनी त्यांचे रोप देऊन स्वागत केले. सत्तेत गेल्यामुळे ऊस दराची आंदोलने थांबवली व शेतकऱ्यांचे प्रश्‍नही संपलेत, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्‍नावर सदाभाऊ म्हणाले, ""पूर्वीचे सरकार शेतकरीविरोधी होते. शेतकऱ्यांशी ते अमानुषपणे वागले. शेतकऱ्यांचा त्यांनी छळ केला; पण न्याय काही दिला नाही. आंदोलन केल्याशिवाय त्यांनी कधीच निर्णय घेतला नाही; पण आताचे युती सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचे असून, आम्ही एफआरपी अधिक 175 रुपयांचा फॉर्म्युला कारखानदारांपुढे ठेवला होता; पण त्यापुढे जाऊन कारखान्यांनी दर दिला आहे. त्यामुळे आमची आंदोलनाची एनर्जी आम्ही दुसरीकडे वापरण्यावर भर दिला आहे. आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले काढण्यासाठी आम्ही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यपातळीवर निर्णय घेणार आहोत.''

Web Title: All is well with the MP Shetty