आ. पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटीलांच्या जनशक्तीचा विजय 

आ. पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटीलांच्या जनशक्तीचा विजय 

मसूर (ता. कऱ्हाड) : सर्वांगीण विकासासाठी येथील मतदारांनी जनशक्ती पॅनेलवर विश्वास ठेवत विजयाचा गुलाल टाकला. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या बाजूने कौल देत विरोधकांच्या मनोमिलनासह घराणेशाहीच्या आरोपाला मतदारांनी धुडकावत सत्तांतर घडवले. पाच वर्षाच्या निष्क्रिय कारभार मतदारांसमोर मांडण्यात विजयी पॅनल प्रमुख यशस्वी ठरले. 

पॅनल प्रमुख जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस  नंदकुमार जगदाळे यांच्या अथक प्रयत्नामुळे जनशक्ती पॅनलच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मसूर ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. पराभव का पत्करावा लागला. आपण कुठे कमी पडलो. त्याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कऱ्हाड उत्तर मधल्या मोठ्या उत्पन्नाच्या मसूर ग्रामपंचायतीची निवडणूक मातब्बरांच्या सहभागामुळे प्रतिष्ठेची बनली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीच्या लढतीकडे वेधले होते. जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांचे जनशक्ती पॅनल व कोयना दुध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे यांचे मसूर नागरिक पॅनेल यांच्यात सरळ लढत झाली. आठ दिवसापासून प्रचाराचे रान उठले होते. पत्रकबाजी द्वारे मोठा आरोप-प्रत्यारोपाचा प्रचार झाला. नेत्यांनी, उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. अखेर मतदारांनी जनशक्ती पॅनेलच्या बाजूने सरपंच पदा सह 17 पैकी 15 विजयी  कौल दिला. विरोधकांना दोन जागा मिळाल्या.

मसूरचे अनेक प्रलंबित प्रश्न, परिवर्तनाशिवाय विकास नाही स्वच्छ व पारदर्शक कारभाराची हमी, घराणेशाही नव्हे तर विकास शाही, मनोमिलन केलेल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे विरोधकांकडून खच्चीकरणाचा प्रयत्न, जनशक्तीच्या उमेदवारावर अपात्रतेचे नाहक आरोप, विरोधकांची प्रचारातून संस्कृती ,आदी बाबी  जनशक्ती पॅनलद्वारे मतदारावर बिंबवण्यात आल्या. ग्रामपंचायत भवन, भुयारी गटार योजना, अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, सांस्कृतिक भवन, उद्यानाचे सुशोभीकरण, घरकुलांची पूर्ती आदी कामाबाबतचा जाहीरनामा मतदारांपुढे मांडला. त्याचा प्रभाव मतदारांवर ही पडला. पॅनेल विजयी करण्यात नेतेमंडळी कार्यकर्ते यशस्वी ठरले.

घराणेशाही, एकाधिकारशाही, दंडेलशाही, हप्ते शाही, कमीशनशाही असा आरोप विरोधक नागरिक पॅनेलकडून केला गेला. मानसिंगराव जगदाळे व नंदकुमार जगदाळे यांचे मनो मिलनक केवळ स्वार्थासाठीच आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून घरातच उमेदवारी दिल्याचा आरोप विरोधकांनी प्रचारात राबवला होता .मात्र ही मात्रा लागू पडली नाही. मतदारांवर प्रभाव पडण्यास नागरिक पॅनेल  अयशस्वी ठरले. विरोधकांचा सोशल मीडियावरचा  प्रचारही गाजला होता .जनशक्ती पॅनलच्या विजयी सरपंच पदा सह 15 उमेदवार मोठ्या फरकाने विजय मिळाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने मतदारांनी चांगलेच नाकारल्याचे स्पष्ट झाले'.

सरपंच पद ओबीसीसाठी आहे. पंकज बाळकृष्ण दीक्षित मोठ्या फरकाने विजय ठरल्याने सरपंच पदासाठी दावेदार ठरले आहेत .समाजहिताचा व गावच्या सर्वांगीण विकासाचा वसा त्यांनी पत्करला .या गावकारभार्‍याकडून गावाला मोठ्या अपेक्षा आहेत. सरपंच पदाचा लढतीत नागरिक पॅनलचे अमोल पोकळे यांच्यासह श्रीकांत जिरंगे सुनील दळवी अमोल जाधव गजानन पुजारी हे चार अपक्ष होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com