विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

राजकुमार शहा 
सोमवार, 9 जुलै 2018

मोहोळ - आमदार तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडु यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त पापरी ता मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थाना वहया व शालेय साहीत्याचे वाटप संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव व मोहोळ तालुका अध्यक्ष सज्जन चवरे यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव म्हणाले प्रहार संघटनेच्या माध्यमातुन शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे समाजाने आपल्याला काय दिले या पेक्षा आपण समाजासाठी काय केले हे पाहणे महत्वाचे आहे आज पर्यंत आ  कडु यांच्या  वाढदिवसानिमीत सात ठिकाणी सुमारे तीन हजार वह्या व शालेय साहीत्याचे वाटप केले असल्याचे सांगुन  नागरीकांच्या अडचणीचा लवकर निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषद गट  निहाय संघटनेच्या प्रतिनिधींची नेमणुक करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगीतले 

यावेळी भिमा कारखान्याचे संचालक राजेंद्र टेकळे यांनी आष्टी तलाव परिसरात तेरा ट्रान्सफॉर्मर बसवुन तयार आहेत केवळ अधिकाऱ्यांच्या ऊदासीन ते मुळे ते सूरू केले नसल्याची तर पापरी कोन्हेरी फिडर वरील विद्युत पुरवठा सारखा खंडीत होत असल्याची तक्रार जाधव यांच्याकडे केली

यावेळी प्रशांत पाटील आनंद जाधव सुनील जाधव बाळासो टेकळे महावीर भोसले रवि पाटील रमेश टेकळे कैलास माळी पिंटु गायकवाड समाधान सावंत कैलास भोसले आदि सह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थीत होते 

Web Title: Allotment of School material to Students