अलमट्टीतून 4 लाख 50 हजार तर, राधानगरीतून 8400 क्‍युसेकचा विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - अलमट्टी धरणातून आज सायंकाळी चार वाजता 4 लाख 50 हजार क्‍युसेकचा तर राधानगरी धरणातून 7,112 क्‍युसेकचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वयक अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. 

कोल्हापूर - अलमट्टी धरणातून आज सायंकाळी चार वाजता 4 लाख 50 हजार क्‍युसेकचा तर राधानगरी धरणातून 8400 क्‍युसेकचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वयक अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे.

कोयना धरणातून सायंकाळी पाच वाजता 77,387 इतका विसर्ग होत आहे.  तसेच  कोल्हापूर - राधानगरी धरणाचे सायंकाळी पाच वाजता तीन स्वयंचलीत दरवाजे उघडले. त्यामुळे धरणातून 8400 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. 

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सायंकाळी 4 वाजता 52 फूट 4 इंच असून एकूण 107 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. 

जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा - 
तुळशी 3.34 टीएमसी, वारणा 32.12 टीएमसी, दुधंगगा 22.78 टीएमसी, कासारी 2.52 टीएमसी, कुंभी 2.54 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी 

बंधाऱ्यांची पाणी पातळी 
राजाराम 52.4 फूट, रूई 80.6 फूट, इचलकरंजी 77.6 फूट, तेरवाड 82.6 फूट, शिरोळ 77.10 फूट, नृसिंहवाडी 77.10 फूट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Almatti Dam water discharge above 4 lakh