सोलापुरात आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सोलापूर : अक्षय तृतीयेच्या सणाला आंब्याचे घरोघरी महत्त्व असते. आजच्या या सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथील विविध ठिकाणच्या बाजारात, विक्री केंद्रावर हापूस आंब्याचे भाव तब्बल 600 ते 700 रुपये डझन असे होते. मात्र, तो हापूस कर्नाटकचा असल्याचे बोलले जात होते.

कोकणी हापूसची एक हजार 200 रुपये डझन अशी किंमत होती. त्यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांनी आंब्यापासून दूर राहणेच पसंत केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

पायरी, लालबाग, केशर, बदाम जातीच्या आंब्याचे दर तुलनेने कमी होते. काल दुपारी लक्ष्मी मार्केटमधील विविध ठिकाणी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मस्त पिवळसर रंगाच्या, गोड आंब्यांचा वास लक्ष्मी मार्केट परिसरात दरवळत होता.

छोट्या छोट्या कागदी बॉक्‍समध्ये गुलाबी कागदाच्या पार्श्‍वभूमीवर ठेवलेले आंबे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत होते. कर्नाटक हापूस 700 रुपये डझन असला तरी घेण्याची तयारी असणारे काही चोखंदळ ग्राहक हा नक्की देवगड, रत्नागिरी किंवा कोकणचाच हापूस आहे ना, की कर्नाटकी हापूस अशी चौकशी विक्रेत्यांकडे करताना दिसत होते. मुरब्बी विक्रेते मात्र "... जी साब बिल्कूल हापूस ही है, खा के तो देखो' असे काहीसे गोलमोटल, संदिग्ध उत्तर देताना दिसून येत होते.

हीच परिस्थिती सात रस्ता येथील आंब्याच्या विक्रेत्यांबाबत दिसून येत होती. याठिकाणी उच्च प्रतिच्या आंब्याचे दर चढे होते. सायंकाळनंतर या भागात आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलेली दिसून आली. निसर्गाने फटका दिल्याने उत्पादन कमी झाल्याने सोलापुरात कोकणी हापूस आंब्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे या आंब्याचे भाव चढे असल्याचे विक्रेता मकसूद बागवान यांनी सांगितले. दरम्यान, हापूसच्या तुलनेत पायरी, लालबाग, बदाम या जातीच्या आंब्याचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्‍याचे दिसून येत होते.

या जातीचे आंबे घेण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. दरम्यान, अक्षय तृतीयेनिमित्त श्राद्ध विधीसाठी लागणाऱ्या मातीची भांडी (मडके), सुत गुंडी, विड्याची पानं, हार-फुलं, सुपारी, पत्रावळ खरेदीसाठीही मधला मारुती, लक्ष्मी मार्केट परिसरात गर्दी दिसून आली. 

Web Title: Alphonso mangoes rates in Solapur