सोपान घुंबरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- महमदाबाद-हुन्नूरच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन 

- सोपान घुंबरे यांचे उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू 

- गेले 11 दिवस सोपान मृत्यूशी झुंज देत होते

भोसे : महमदाबाद-हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे 6 नोव्हेंबर रोजी सख्ख्या बंधूवर दुसऱ्या भावाच्या कुटुंबावर पेट्रोल ओतून केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले सोपान घुंबरे यांचे उपचारादरम्यान सोलापूर येथील खासगी रुग्णालयात रविवारी (ता. 17) रात्री साडेअकरा वाजता निधन झाले. त्यामुळे या घटनेत मृत झालेल्यांची संख्या दोन झाली. 

6 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता लक्ष्मण घुंबरे याने बंधू सोपान घुंबरे व त्यांच्या कुटुंबीयांवर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. या घटनेत शरद सोपान घुंबरे (वय 12) या शाळकरी मुलाचा अंत झाला होता. सोपान व सोनाबाई हे पती-पत्नी गंभीररीत्या भाजून जखमी झाले होते. उपचारासाठी सोपान व सोनाबाई या पती-पत्नीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे सोपान यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेले 11 दिवस सोपान मृत्यूशी झुंज देत होते. अखेर रविवारी त्यांचे निधन झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Also of the stroller Death during treatment