दुर्गम भागातील शिक्षणावर भर देणार - अमन मित्तल

अरविंद सुतार
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कोनवडे - धनगरवाडा व दुर्गम भागातील शाळांच्या सुविधांसाठी शासनातर्फे तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. प्रगत शिक्षणासाठी नेहमीच भर राहील,  असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. 

विद्या मंदिर बसुदेव धनगरवाडा (ता. भुदरगड) येथे कंजर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर व शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे होते. 

शिक्षण सभापती घाटगे म्हणाले, शिक्षण विभागाच्या वतीने दुर्गम भागातील शाळांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.       

फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक घेवडे, पं. स. सभापती स्नेहल परिट, जि. प. सदस्य जीवन पाटील, पं. स. सदस्या आक्काताई नलवडे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे, केंद्रप्रमुख बी. एस. पवार, मुख्याध्यापक श्रीकांत माणगावकर, डी. के. परिट, प्रवीण नलवडे, सरपंच सचिन गुरव, तानाजी बाजारी, मनू हुंबे, धनाजी बाजारी, मारुती बोंगार्डे उपस्थित होते.

प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले. राहुल जाधव, महांतेश पाटील, संदीप शिंदे, विश्वनाथ नलवडे, दिगंबर मानकर, दत्ता केंद्रे यांनी केले. आभार चंद्रकांत मोरस्कर यांनी मानले.

Web Title: Aman Mittal comment