ग्राम विकासासाठी सरपंच - ग्रामसेवक या दोघांत समन्वय हवा - अमन मित्तल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

आपटी - सरपंच आणि ग्रामसेवक ही प्रशासनाची दोन चाकं असून दोघांत समन्वय साधल्यास गावच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने गती येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. पोर्ले तर्फ ठाणे येथे आयोजित ग्रामसेवक व सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

मित्तल म्हणाले, ‘‘सरपंच आणि ग्रामसेवकांना एकत्र येऊन गावच्या अडचणींसंदर्भात विचार करण्याचे प्रसंग खूप कमी वेळा येतात. त्यामुळे अशा कार्यशाळा फायदेशीर ठरतात. या उपक्रमातून नवीन काही शिकायला मिळते. हेच अवघड काम सभापती व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून सोपे झाले. हाच आदर्श घेऊन अशा प्रकारचे उपक्रम अन्यत्र राबवले जावेत. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’

अशा कार्यशाळेमुळे शासनाच्या विविध योजना व त्यांची अंमलबजावणी कशी करावी, याविषयी परिपूर्ण माहिती मिळाली. त्याचा गावच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्हा सरपंचांना नक्कीच फायदा होईल.
- प्रियांका महाडिक,
सरपंच जिऊर/म्हाळुंगे

सभापती अनिल कंदूरकर यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोचावा या उद्देशाने त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आली आहे. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यशाळेमुळे सरपंचांना प्रशासनातील अनेक बाबीचे ज्ञान मिळाले.’’

कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, समाज कल्याण सभापती विशांत महापुरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, कल्पना चौगुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, उपसभापती संजय माने, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. रविकांत लाड व तालुक्‍यातील सर्व सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

Web Title: Aman Mittal comment