डॉ. आंबेडकर विचार संमेलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सोलापूर : मार्क्‍सवाद्यांनी व गांधीवाद्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काय केले? या प्रमुख विषयावर 14 जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजाला डॉ. आंबेडकरांचे कार्य व विचार समजावून सांगितले जाणार असल्याची माहिती प्रा. एम. आर. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. आंबेडकरांचे विचार व कार्य मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न समाजातील काही घटकांकडून होत आहे. नव्या पिढीला बाबासाहेबांचे विशाल विचार व कार्य समजावेत यासाठी हे संमेलन होणार आहे. दोन सत्रांमध्ये हे संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील आंबेडकरी चळवळीला नक्षलवाद्यांशी जोडले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संमेलनातील होणारी सत्र व वक्ते यांची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, सुबोध वाघमोडे, बाळासाहेब वाघमारे, अशुतोष नाटकर, मनीष सुरवसे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. 

Web Title: Ambedkar Concept Summit