वॅाटर कप स्पर्धेच्या ठिकाणीच आंबेडकर जयंती साजरी

किरण चव्हाण 
शनिवार, 14 एप्रिल 2018

माढा (सोलापूर) ः माढा तालुक्यातील पाणी फाऊंडेशनच्या वॅाटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या लोंढेवाडी, वरवडे, तुळशी, पडसाळी यासह काही गावात भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कामाच्या ठिकाणीच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून श्रमदान करून जयंती साजरी केली. 

माढा तालुक्यातील वॅाटर कप स्पर्धेत सहभागी गावातील लोंढेवाडी, पडसाळी, वरवडे, तुळशी या गावातील ग्रामस्थांनी शनिवारी ( ता. 14 ) भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणी फाऊंडेशनची कामे सुरू असलेल्या ठिकाणीच डॅा. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. अनेक गावातील ग्रामस्थांनी डॅा. आंबेडकरांना पाणी फाऊंडेशनच्या वॅाटर कप स्पर्धेत श्रमदान करून अभिवादन केले.  जयंतीनिमित्त पाणी फाऊंडेशनच्या कामावर श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांची संख्या वाढलेली दिसून आली. माढा तालुक्यात गावे पाणीदार करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे.

Web Title: ambedkar jayanti celebrates on water cup competition