शेतीसाठी पाणी न वापरण्याचा निर्णय

अंभेरी - कमी पाऊस पडूनही पाण्याचा काटकसरीने उपयोग होत असल्याने तलाव्यात आजपर्यंत पाण्याचा साठा समाधानकारक आहे.
अंभेरी - कमी पाऊस पडूनही पाण्याचा काटकसरीने उपयोग होत असल्याने तलाव्यात आजपर्यंत पाण्याचा साठा समाधानकारक आहे.

खटाव - उन्हाळा सुरू झाला, की पाणीटंचाई जाणवू लागते. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली, तरी त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहता नाही. या पार्श्‍वभूमीवर अंभेरी (ता. खटाव) गावाने उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरायचे नाही, असा अलिखित नियम केल्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत झाली आहे. 

गावाला दर वर्षी पाऊस जेमतेमच असतो. १९७२ च्या दुष्काळात झालेल्या दोन तलावांत पडणाऱ्या पावसाचे पाणी बऱ्यापैकी अडून राहते. एवढाच काय गावाला पाण्याचा आधार आहे. मात्र, पूर्वी गावच्या बेफिकिरीमुळे उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात असल्यामुळे पिण्यासाठीही पाणी उरत नसे. या पार्श्‍वभूमीवर गावाला उशिरा का होईना शहानपण सुचले असून, सर्वानुमते उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरायचे नाही असा अलिखित नियम घालून घेतल्याने पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत झाली आहे. 

आज तालुका भयानक दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. मात्र, या तलांवामधील पाण्याचा काटकसरीने वापर केल्याने गावाला दुष्काळाची पूर्वी एवढी दाहकता जाणवत नाही. दोन्ही पाझर तलाव भूजलासाठी फारच उपयुक्त ठरले आहेत. या तलावांचा पाझर जवळपासच्या विहिरींना व कूपनलिकांना समृद्ध करण्यात झाला असल्याचा ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे.

गावाला मे महिन्यात पाण्याची चणचण नक्कीच भासणार; पण तोपर्यंत तरी या तलाव्यांच्या आधारामुळे पाण्याची चणचण जाणवणार नाही. मात्र, दोन्हीही तलावे खूप जुने असल्याने तलाव्यात गाळ खूप साचला आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये प्रचंड झाडी वाढली आहे व गळतीचे कामदेखील करणे जरुरीचे आहे. प्रशासनाने त्वरित या कामात लक्ष घालून या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी ग्रामस्थ मंगेश शिंदे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com