निराश होऊन शाळा सोडलेल्या युवकांसमोर अमोल ठरतोय आदर्श

अक्षय गुंड 
सोमवार, 11 मार्च 2019

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - शारीरिक विकलांगता आली की, माणुस खचून जातो. जगण्याची अशा सोडुन देतो. त्यांना दिव्यांग असल्याची सल मनात सतत बोचत असते. परिणामी दिव्यांग असलेल्या व्यक्ती शिक्षणापासुन, कामापासुन दुरावतात. काही जण अपंग असल्याचा फायदा घेत मंदिरात, रस्त्यात भिक्षेकरी बनतात. पण काही असे जन्मताच जरी दिव्यांग असले तरी जगावेगळे करण्यात त्यांची धमक असते. शारीरिक विकलांग असले तरी मनाने ते अपंग नसतात. स्वतःच्या आत्मविश्वास, चिकाटीवर च्या जोरावर अंपगावर मात करत 'अटेकपार झेंडा' रोवण्याची त्यांची इच्छा असते.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) - शारीरिक विकलांगता आली की, माणुस खचून जातो. जगण्याची अशा सोडुन देतो. त्यांना दिव्यांग असल्याची सल मनात सतत बोचत असते. परिणामी दिव्यांग असलेल्या व्यक्ती शिक्षणापासुन, कामापासुन दुरावतात. काही जण अपंग असल्याचा फायदा घेत मंदिरात, रस्त्यात भिक्षेकरी बनतात. पण काही असे जन्मताच जरी दिव्यांग असले तरी जगावेगळे करण्यात त्यांची धमक असते. शारीरिक विकलांग असले तरी मनाने ते अपंग नसतात. स्वतःच्या आत्मविश्वास, चिकाटीवर च्या जोरावर अंपगावर मात करत 'अटेकपार झेंडा' रोवण्याची त्यांची इच्छा असते. माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील अमोल झाडे या युवकांने अंपगात्वर मात करत प्राध्यापक व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून पदवीचे शिक्षण पुर्ण करून, सध्या तो पदवीत्तोरचे शिक्षण घेत आहे. 

अमोल झाडे हा सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा. घरची परिस्थिती बेताची असताना त्यातच अमोलला जन्मताच हातापायची बोटे नसल्याने आई-वडील यांना अमोलच्या भविष्याबाबत सतत चिंता वाटत असे. त्यामुळे त्याला उपाचारासाठी आई-वडिलांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडुन सल्लेही घेतले. अमोल हा शारिरीक विकलांग जरी असला तरी बुध्दीने चाणाक्ष आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिल व आजीने त्याला पाठबळ व खंबीर साथ देत त्याला नवी उभारी देण्याचा मनी निश्चय केला. अमोलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपळाई बुद्रूक गावातच झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे बी.ए. मधुन केले. 

विशेष म्हणजे अमोल हा शारीरिक विकलांग असताना, शैक्षणिक एकही वर्षे वाया न जाऊ देता. त्याने दहावी, बारावी व पदवीचे शिक्षण चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाला आहे. अनेक जण हातापायाने धडधाकट असताना देखील दहावी, बारावी निघत नसल्याच्या नैराश्याने निराश होऊन आत्महत्या केलेले तसेच शाळा सोडुन दिलेली अनेक मुले दिसतात. पण अमोलने या सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. हातपायाला बोटे नसली म्हणुन काय झाले, शारिरीक अंपगत्व असले तरी मनाने अंपगत्व नसलेल्या अमोलने जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जात, अंपगत्वाच्या वेदना सहन करत पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्याची प्राध्यापक होण्याची इच्छा असल्याने त्या दिक्षेने वाटचाल सुरू आहे. त्याला शासनाकडुन ठोस अश्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. हातपायाला बोटे नसताना अमोलने शिक्षणात घेतलेली भरारी हि युवकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. 

अंपगत्वाचा कोणताही न्यूनगंड मनात न बाळगता इतरापेक्षा काहीतरी वेगळे करायचे या उद्देशाने मी सध्या बारामती येथे एम.ए चे शिक्षण घेत आहे. माझ्यासारख्या इतर मुलांनी खचुन न जाता इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्ती प्रमाणे प्रमाणे प्रयत्न करावेत. यश हमखास मिळेल. याचा अनुभव येईल. - अमोल झाडे,उपळाई बुद्रूक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amol is Ideal for youths those who leaving school