मोफत पाठ्यपुस्तकांची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

बॅंकेत खाती काढण्याचे आदेश - आधार क्रमांकही महत्त्वाचा
कोल्हापूर - इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यापुढे विद्यार्थ्यांना थेट पुस्तके देण्याऐवजी त्यासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत अथवा शेड्युल्ड बॅंकेत शून्य रकमेची (झिरो बॅलन्स) सर्व विद्यार्थ्यांची खाती उघडण्याचे आदेश राज्याचे शिक्षण सचिव व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

विविध कल्याणकारी योजनेंतर्गत शासनामार्फत लाभार्थीला विविध साहित्य, वस्तू पुरविण्यात येत होत्या; मात्र १ डिसेंबर २०१६ला शासनाने एक आदेश काढून यापुढे वस्तूरूपात मिळणारे लाभ बंद करून रोख रक्कम लाभार्थीच्या बॅंक खात्यात जमा करण्याबाबत सूचित केले आहे. 

त्यानुसार कल्याणकारी योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची बॅंकेमध्ये खाती असणे आवश्‍यक आहे. सध्या सर्वच विद्यार्थ्यांची बॅंकेत खाती नाहीत. ही खाती तत्काळ उघडण्याबाबत कळविले आहे. शिवाय या खात्याला विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जोडण्यासही सांगितले आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासनमान्य सर्व माध्यमांच्या शाळातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्यात दिवशी दिली जात होती.
शिक्षकवर्ग पाठ्यपुस्तके देण्याची जबाबदारी पार पाडत होते. 

१ कोटी ७५ लाख विद्यार्थी संख्या
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ कोटी ७५ लाख एवढी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपली बॅंक खाती काढावी लागणार आहेत.

पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न?
नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शाळेकडून अंदाजे कळविली जायची व त्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जात होती. आता यापुढे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोफत पाठ्यपुस्तके व रकमेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यावर शासन काय उपाय काढते ते महत्त्वाचे आहे.

Web Title: The amount of free book student account