सोलापूर : सोनके-तिसंगी तलाव भरण्यासाठी उपाेषण सुरुच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सोनके-तिसंगी तलाव भरण्यासाठी गेली तीन दिवस झाले इंनलेट नाला तिसंगी येथे आमरण उपोषणासाठी सोनके गावातील युवक शेतकरी तानाजी गोफणे, नवनाथ कोळेकर, पांडुरंग हाके, संतोष पाटील उपोषणास बसले असून, त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे.

तिसंगी : सोनके-तिसंगी तलाव भरण्यासाठी गेली तीन दिवस झाले इंनलेट नाला तिसंगी येथे आमरण उपोषणासाठी सोनके गावातील युवक शेतकरी तानाजी गोफणे, नवनाथ कोळेकर, पांडुरंग हाके, संतोष पाटील उपोषणास बसले असून, त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. 

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी कोणतीही प्राशासकिय यंत्रणा तैनात नाही.

तिसंगी-सोनके हा तलाव वीर भाटघर धरणातून भरला जातो. या पावसाळ्यात वीर-भाटघर सह पुणे जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरले असूनही अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे तलावात पाणी न सोडल्याने तिसंगी-सोनके तलाव आज मितिस कोरडा आहे.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर सांगोला परिसरात पावसानेे ओढ दिल्याने परिसरात पिण्यासाठी पण पाणी नसलेने जनावरांच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परिसरात टँकरणे पाणी पुरवठा केला जात आहे. पण तलावात पाणी सोडणासाठी (ता. २६ पासून) आमरण उपोषण युवा शेतकऱ्यांनी चालु केले आहे. 

उपोषणासाठी पांडुरंग दगडु हाके, नवनाथ भिकाजी कोळेकर, संतोष वासुदेव पाटील, तानाजी बिरा गोफणे बसले आहेत. त्यांचा आरोप आहे की ओहर फ्लो झालेले पाणी संगनमत करून अधिकारी वर्गानी सांगोला तालुका परिसरात आमच्या हक्काचे पाणी पळवले आहे. ते हक्काचे पाणी तलावात सोडेपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. उपोषणस्थळी सोनके, तिसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित आहे. सांगोला तालुक्याचे युवा नेते श्रीकांत देशमुख घटनास्थळी भेट देऊन उपोषण कर्ताची प्रकृतीची चौकशी करून पाणी सोडण्याबाबत विभागाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर,कार्यकारी अभियांत्ता अमोल निकम यांच्याशी फोनवर चर्चा करून पाणी सोडण्या बाबतचे आदेश काढण्यात यावे याबाबत चर्चा केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anchorage to fill Sonke-Tisangi Lake in solapur district