"कृष्णा' नदीवर 'येथे' बांधला जाणार नवीन पूल; 13 कोटी मंजूर

भद्रेश भाटे | Monday, 27 July 2020

 पालिकेच्या उत्पन्नातून हे काम होऊ शकत नसल्याने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामास शासनाने मंजुरी दिली असून, लवकरच या कामाच्या ई निविदा प्रसिद्ध होतील. एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे  आमदार मकरंद पाटील यांनी नमूद केले.

वाई : पालिका हद्दीतील कृष्णा नदीवरील शहराच्या उत्तर- दक्षिण भागांना जोडणारा ब्रिटिशकालीन पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठीच्या कामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता, तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 13 कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चास मंजुरी दिल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
यवतेश्वरचे श्री शंभू महादेव मंदिर
 
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर ब्रिटिश सरकारने 1884 मध्ये म्हणजे 136 वर्षांपूर्वी दगडी बांधकामात भक्कम पूल बांधला आहे. या पुलामुळे शहराचा उत्तर - दक्षिण भाग एकमेकाला जोडले गेले आहेत. या पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सध्या हा पूल शहराची जीवन वाहिनी आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आज हा जुना पूल वाहतुकीस अपुरा पडत आहे. पावसाळ्यात नदीला महापूर आला की पूल वाहतुकीस बंद करण्यात येतो. पुलाची कालमर्यादा संपल्याने स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांना, एसटी वाहतुकीला हा पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या पुलाचे आरेखन व खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. पुढील शंभर वर्षांच्या वाहतुकीला पुरा पडेल अशादृष्टीने पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पूल पाडून नवीन बांधण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

सेना, राष्ट्रवादीच्या दोन गटांत सातारा जिल्ह्यात हाणामारी; 11 जणांना अटक 

कोरोनाबाधित पोलिसास छळणाऱ्या त्या तिघांवर कारवाईचे एसपी तेजस्वी सातपुतेंचे आदेश

यासाठी 13 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी शंभर टक्के निधी शासन देणार असून, पालिकेच्या अखत्यारीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. पालिकेच्या उत्पन्नातून हे काम होऊ शकत नसल्याने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामास शासनाने मंजुरी दिली असून, लवकरच या कामाच्या ई निविदा प्रसिद्ध होतील. एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
Edited By : Siddharth Latkar

उदयनराजेंनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याशी तासभर चर्चा केली

जर्मनीतील पतीचा जबाब नोंदविला गेला अन् न्यायनिवाडा झाला