अंगणवाड्यांसाठी चार कोटी निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांची भौतिक सुधारणा होण्यास आता आणखी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अंगणवाड्यांसाठी नवीन खोली बांधकाम व दुरुस्तीसाठी चार कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सुमारे २०० अंगणवाड्यांची दुरुस्ती, तर ३० अंगणवाड्यांसाठी नवीन खोल्या मिळतील.

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या आयएसओ होत असल्या तरी अद्यापही शेकडो अंगणवाड्यांसाठी खोल्या नाहीत, ही स्थिती आहे. खोल्या बांधकामासाठी आवश्‍यक प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक अडचणी उभ्या होत आहे. 

चालू आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या नवीन खोल्या बांधकाम व खोल्या दुरुस्तीसाठी दहा कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आली होती. त्यापैकी सध्या चार कोटींना मंजुरी मिळाली आहे. 

नवीन खोली बांधण्यासाठी सहा लाख तर दुरुस्तीसाठी एक लाखाची तरतूद केली जाते. त्यामुळे या निधीतून सुमारे ३० नवीन खोल्यांचे बांधकाम, तर २०० खोल्यांची दुरुस्ती होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) जावेद शेख यांनी सांगितले. 

दरम्यान, नवीन खोल्या बांधकामासाठी जिल्ह्यातून सुमारे २०० खोल्यांचे प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्तावित आहेत. या खोल्या बांधकामसाठी शासनाकडून भरीव तरतूद करणे आवश्‍यक आहे. जिल्हा नियोजन समितीकडे यावर्षी दहा कोटींची मागणी केली असून, तीही पूर्ण क्षमतेने पूर्ण करणे गरजेचे आहे.

Web Title: anganwadi 4 crore rupees fund sanction