कोथळे खूनप्रकरण - कामटेचा न्यायालयात उद्दामपणा 

कोथळे खूनप्रकरण - कामटेचा न्यायालयात उद्दामपणा 

सांगली - अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने आज न्यायालयात उद्दामपणा केला. दोषारोपपत्राची न्यायालयाकडे दाखल असलेल्या कागजपत्रांची प्रत मला हवी आहे, अशी मागणी करत त्याने थेट "प्रत बदलली जाईल', असा संशय व्यक्त केला. त्यामुळे न्यायाधीशांनी कामटे याला चांगलेच फैलावर घेतले. त्याच्या वकिलांनी दिलेला अर्ज फेटाळून लावला.

यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. 
गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत कोथळे मृत्यूकांड प्रकरण घडले होते. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांना अटक झाली होती. त्यांना तीन दिवसांची कोठडी मिळाली. त्याच दिवशी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी कोठडीत चौकशी करताना अनिकेतला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या एकूण प्रकरणात कामटे यांनी सातत्याने उद्दामपणाचे कृत्य केले आहे. दाखल दोषारोपपत्राची नक्कल प्रतीवर स्वाक्षरी आणि शिक्का देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी त्याला न्यायालयात आणण्यात आले. नक्कल प्रत बदलली जाईल, असा संशय व्यक्त केला. त्याने अप्रत्यक्षपणे न्यायालयावरच संशय व्यक्त केल्याने न्यायाधीशांनी झापले. 

दरम्यान, कामटेसह त्याचे साथीदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनाही न्यायालयात हजर होते. 

खूनप्रकरणी आणखी पुरावे 
खूनप्रकरणी सीआयडीने आणखी पुरावे गोळा केले आहेत. त्याची पुरवणी कादपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com